30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeलातूर१५ गटांतील लढतीवर सर्वांचेच विशेष लक्ष

१५ गटांतील लढतीवर सर्वांचेच विशेष लक्ष

लातूर : प्रतिनिधी
मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्य पदासाठी (गटासाठी) निवडणूकीचा फड सध्या चांगलाच रंगात आला आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीत ५९ पैकी १५ सदस्य हे सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडले जाणार आसल्याने या जागेवरच्या लढती या दमदार व तुल्यबळ होताना दिसून येत आहेत. छाननी नंतर उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रचारासाठी व मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या हातात आता मोजकेच दिवस शिल्ल्लक राहिले आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटाच्या जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या ११८ गणांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आहे. नामनिर्देशनपत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५९ गटातून २१२ जणांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले. तर पंचायत समित्यांच्या ११८ गणातून ३५८ जणांनी नामनिर्देशनपत्र परत घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ जगांसाठी २४२ उमेदवार रिंगात आहेत. तर पंचायत समित्यांच्या ११८ जागेसाठी ४२० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी दाखल नामनिर्देशनपत्र परत घेण्याचा कालावधी संपल्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधातील कांही उमेदवारांना मनधरणी करून नामनिर्देशनपत्र परत घेतल्यानंतर आता कांही ठिकाणी मोजकेच उमेदवार निवडणूकीच्या मैदानात राहिले आहेत. त्यामुळे या लढती तुल्याबळ होणार असल्याने कार्यकर्तेही गावे पिंजून काढत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेस सुटले असल्याने या ठिकाणच्या गटांच्या निवडणूकांकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष लागले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व १० पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ७ फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी व लातूर पंचायत समितीच्या  २० गणांसाठी मतदान होणार आहे. तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हातात प्रचारासाठी सात दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR