लातूर : प्रतिनिधी
७० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणा-या व्यक्तींकरिता वय वंदना कार्ड मोहीम आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्यामार्फत गाव पातळीवर सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये २० फेब्रुवारी पासून ३ हजार ६०० वय वंदना कार्ड काढण्यात आलेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १५ हजार वय वंदना कार्ड काढण्यात आलेले आहेत.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित राबविल्या जातात. ही आरोग्याची अतिशय महत्वकांक्षी योजना असून महाराष्ट्रातील सर्व रहिवासी कुटुंबाला लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयामध्ये प्रति कुटुंव प्रति वर्ष ५ लाख पर्यंतचे २ हजार ३९९ आजारासाठी, शखक्रियासाठी गोफत (कॅशलेस) उपचार केले जातात. तसेच ७० व त्यापेक्षा अधिक वय असणा-या नागरिकांसाठी वैयक्तिक पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. हे उपचार घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आयुष्यमान कार्ड व वयवंदना कार्ड असणे गरजेचे आहे. त्यामुळै लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान कार्ड व वयवंदना कार्ड बनवण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरीक स्वत: कार्ड बनवू शकतात
नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड किया वयवंदना कार्ड बनवण्यासाठी आपल्या गावातील आशा, ग्रामपंचायत किवा नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच पात्र लाभार्थी आयुष्मान अप, पोर्टल द्वारे इील्लीा्रू्रं१८ लॉगिनमधून स्वत: आपले आयुष्मान कार्ड तयार करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी आपापले आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्ड नोंदणी करून काढावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
६१ हजार रूग्णांनी घेतला योजनेचा लाभ
लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत ५७ अंगीकृत रुग्णालये आहेत. त्यापैकी खाजगी ४१ व शासकीय १६ योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये लाभ घेण्यासाठी त्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र यांच्याशी भेटून रुग्णांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लातूर जिल्हयामध्ये १ एप्रिल २०२० पासून आतापर्यत ६१ हजार ४०१ रुग्णांच्यावर १ लाख ९६० केसेससाठी २८० कोटी ९२ लाख ३० हजार ३०९ शासनातर्फे खर्च झाले आहेत.

