१९ लाखांचा अवैध मद्य साठा जप्त

लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० ऑक्टोबर रोजी लातूर येथील मळवटी रोडवरील सद्गुरू नगर भागात बेकायदा गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंध असलेला विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान घटनास्थळी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मि.ली. क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या एकूण १ हजार १५२ सीलबंद बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रँड्सच्या १८० मि.ली. क्षमतेच्या १२५ बाटल्या, ५ हजार ६५० नगांचे विविध ब्रँडचे बनावट बूच, मद्य वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन आणि दोन मोबाईल संच असा १७ लाख १ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ङ), (ई), ८१, ८३, ९० व १०३ अन्वये योगेश आत्माराम सांडवे (मद्य साठा मालक, रा. बालाजी मंदिर चौक, सोहेल नगर, जि. लातूर), अशोक प्रभू राजे (जागा मालक, रा. सद्गुरू नगर, मळवटी रोड, ता. जि. लातूर) या दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीतील तपासात मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी उमाकांत गोविंदराव इंगळे याच्या आनंद नगर, लातूर येथील गणेश मंदिराशेजारील राहत्या घरात छापा टाकण्यात आला. तिथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मि.ली. क्षमतेच्या २७६ सीलबंद बाटल्या (रिकव्हरी) मिळून आल्या, ज्यांची किंमत २ लाख ७६ हजार रुपये आहे. यासह या संपूर्ण कारवाईत एकूण १९ लाख ७७ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड, उपअधीक्षक मारुती मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक पी. जी. दाते, लातूर शहर निरीक्षक आर. एस. कोतवाल, चाकूरचे निरीक्षक मनीषा मिसाळ, डी. एच. आशमोड, दुय्यम निरीक्षक व्ही. एस. पवार, भरारी पथकाचे संजय राठोड, रघुनाथ भोसले, बालाजी वाघमोडे, गणेश साळवी, शिवराज वाघमारे, रामेश्वर माकोडे, स्वप्नील काळे, शाहू घुले, दीक्षा साळवी, रोटे आणि कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. केंगारे तसेच जवान कपिल गोसावी, शैलेश गड्डीमे, हणमंत माने, मीरा हासूळे, महिला जवान शीतल पवार, वाहन चालक फाजील खतीब, ए. टी. गुणाले, गजानन होळकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मंगेश खारकर, जोतिराम पवार, श्रीकांत साळुंखे, संतोष केंद्रे, बळी साखरे, भरत गायकवाड, ऋषिकेश चिंचोळीकर, गीता शेनेवाळ, समाधान गिरी, विशाल सुडके, सौरभ पाटवडकर, प्रथमेश फत्तेपूरे यांनी सहभाग नोंदवला. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, लातूरचे दुय्यम निरीक्षक दीपक एच. आशमोड करीत आहेत.
………………४…………….

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news