26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीय१ मिनिटाच्या जाहिरातीमुळे कॅनडा-अमेरिका चर्चा ठप्प

१ मिनिटाच्या जाहिरातीमुळे कॅनडा-अमेरिका चर्चा ठप्प

टोरॅँटो : वृत्तसंस्था
कॅनडातील ओंटारियोच्या प्रांतीय सरकारने जाहिरातबाजी केल्यामुळे, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. ओंटारियो प्रांताने प्रायोजित केलेल्या या ‘अँटी-टॅरिफ’ जाहिरातीवर ट्रम्प यांनी ‘फेक’ असल्याचा गंभीर आरोप केला. या वादामुळे ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेली महत्त्वपूर्ण व्यापार कराराची चर्चा तात्काळ थांबवली आहे.

अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू असतानाच, कॅनडातील ओंटारियो प्रांताच्या सरकारने एक मिनिटाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत रोनाल्ड रीगन यांच्या १९८७ मधील ‘मुक्त आणि निष्पक्ष व्यापार’ या वरील एका रेडिओ भाषणातील काही भाग वापरण्यात आले आहेत. रीगन यांचे मूळ भाषण साधारण पाच मिनिटांचे होते. जाहिरातदारांनी त्या भाषणातील शब्दांचा क्रम बदलून त्यांचा संदर्भ पूर्णपणे बदलला.

जाहिरातीत रीगन यांचे ‘टॅरिफ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला नुकसान पोहोचवतात’ हे वाक्य भाषणाच्या सुरुवातीला ठेवण्यात आले. तसेच, रीगन यांनी संरक्षणवादी कायद्यांना नकार देण्याबद्दल केलेले विधान जाहिरातीच्या शेवटी टाकून, संपूर्ण संदेश टॅरिफ-विरोधी असा तयार करण्यात आला. यातून जणू रीगन यांनी हाय-टॅरिफ धोरणांचा सरळ विरोध केला होता, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ ट्रम्पच नव्हे, तर ‘रोनाल्ड रीगन प्रेसिडेंशियल फाउंडेशन’नेही या जाहिरातीवर चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR