१ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात वाढत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन व लातूर पोलीस विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील दुचाकीस्वारांसाठी दि. १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर पोलीस विभागाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी जनजागृती तसेच कायदेशीर कारवाईवर भर दिला आहे. लातूर जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सुमारे १,५०० पोलीस अधिकारी व अंमलदारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारी घटना म्हणजे रेणापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विश्वास जाधव हे कर्तव्य बजावून  दुचाकीवरून लातूरकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला मागून इंडिका कारने जोरदार धडक दिली. अपघात गंभीर असतानाही त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. यातून हेल्मेट हा केवळ कायद्याचा भाग नसून जीवन वाचविणारे सुरक्षा कवच आहे, हे स्पष्ट होते.
लातूर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘प्रवास सुरक्षित करा—हेल्मेट वापरा’ या संदेशातून व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला ठेऊन नागरिकांना अपघातांचे गांभीर्य समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर विना हेल्मेट तसेच विना सीटबेल्ट वाहन चालविणा-या चालकांवर कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.
मात्र, जनजागृती व कारवाई करूनही अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. चालू वर्षात लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५२८ रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये २४३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषत: दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकांना गंभीर दुखापतींसह प्राण गमवावे लागले आहेत. याउलट अपघाताच्या वेळी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणा-या अनेक नागरिकांना दुखापत झाली असली तरी त्यांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दि. १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती हा केवळ नियम किंवा दंडाची बाब न समजता प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून त्याकडे पाहावे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news