मुंबई/नवी दिल्ली : पाँझी स्किममार्फत भारतातील ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणा-या ऑक्टाएफएक्स या फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ईडीने कारवाई करत २,३८५ कोटी रु.ची क्रिप्टोकरन्सी जप्त केली, तर स्पेनमध्ये या घोटाळ्याचा सूत्रधार पावेल प्रोझोरोव्ह याला अटक केली आहे.
जुलै २२ ते एप्रिल २३ या काळात भारतीय ग्राहकांचे १,८७५ कोटी रु. डुबवले; ८०० कोटी रु. चा नफा कमावला. २०१९-२०२४ मध्ये कंपनीने केवळ भारतातून ५ हजार कोटी रु.चा नफा कमावला. ग्राहकांकडून यूपीआय व बँकांमार्फत पैसा घेतला जात होता. हा पैसा डमी अकाउंटमार्फत परदेशात गुंतवणूक म्हणून दाखवला जायचा.
ऑक्टाएफएक्सची मार्केटिंग टीम ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरून काम करते. स्पेनमधून सर्व्हर व बॅक ऑफिस ऑपरेशन चालतात. इस्टोनियातून पेमेंट गेटवे चालवला जातो. जॉर्जियातून तांत्रिक साहाय्य मिळते. भारतीयांचा पैसा सायप्रसमध्ये जमा केला जातो. दुबईतून काही भारतीय व्यवहार सांभाळले जातात. सिंगापूरमधून आयातीसंदर्भात बोगस सेवा दिली जाते.
पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा.
















