इंदूर : वृत्तसंस्था
इंदूरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वादात एका गटातील सुमारे २४ तृतियपंथींनी विष प्यायले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितली जात आहे. विष प्यायल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर अवस्थेत तृतियपंथींना रुग्णालयात दाखल केले. अॅडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात फिनायल प्यायले असल्याची बाब समोर आली आहे. ही घटना पायल गुरु आणि सपना हाजी गटांमधील दीर्घकाळ चाललेल्या वादाचा परिणाम असल्याचे देखील समोर आले आङबे. यामधून ट्रान्सजेंडर व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग देखील केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
२४ तृतियपंथींवर एमवाय रुग्णालयात उपचार चालू आहेत. सीएमएचओ यांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्व तृतियपंथींवर योग्य ते उपचार केले जात आहेत. सांगण्यात आले की, रुग्णांची स्थिती स्थिर आहे आणि सतत पोलिस प्रशासनाच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. विषारी पदार्थ का प्यायले याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. २४ तृतियपंथींना एम्ब्युलन्सद्वारे एमवाय रुग्णालयात आणले गेले. सर्वांवर उपचार सुरू आहेत आणि स्थिती नियंत्रणात आहे.

