26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीय२९ देशांतील अमेरिकन  राजदूत तातडीने माघारी 

२९ देशांतील अमेरिकन  राजदूत तातडीने माघारी 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाची अंमलबजावणी आक्रमकपणे सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत जगभरातील २९ देशांमध्ये तैनात असलेल्या आपल्या राजदूतांना आणि वरिष्ठ मुत्सद्द्यांना तडकाफडकी माघारी बोलावले आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या राजदूतांची नियुक्ती बायडेन प्रशासनाच्या काळात झाली होती, त्यांची सेवा जानेवारीमध्ये समाप्त होणार असल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘करिअर डिप्लोमॅट्स’चा (अनुभवी मुत्सद्दी) समावेश आहे. विशेष म्हणजे हे राजदूत ट्रम्प यांच्या दुस-या कार्यकाळाच्या सुरुवातीलाही पदावर होते, मात्र आता त्यांना वॉशिंग्टनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्या या पावलामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अशा व्यक्तींची या पदांवर नियुक्ती करायची आहे, जे त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या संकल्पनेला पूर्णपणे पाठिंबा देतील आणि त्यांच्या धोरणांनुसार काम करतील. हे बदल विशेषत: आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये मोठे प्रभाव पाडणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR