छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरनजीक निपाणी फाटा येथे बुधवारी सकाळी दोन बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळच्या सुमारास दुधवाला दूध घेऊन जात असताना त्याचा कॅन रस्त्यावर पडला आणि दूध सांडले.
त्याचवेळी दोन बस आणि कारचा अपघात झाला. एसटी महामंडळाची बस सिडको बसस्टँडवरून लातूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरील दूधवाला खाली कोसळताच दुधाचे कॅन सांडले. त्याचवेळी कारचालकाने ब्रेक दाबले. त्यानंतर मागून येणारी छत्रपती संभाजीनगर-इचलकरंजी बस (क्र. एमएच ०९ एफएल ७४३५) मागून कारला धडकली. त्यानंतर पाठीमागे असलेली छ. संभाजीनगर-लातूर बस मागून बसला धडकली. या अपघातात दोन बस आणि कारचे मोठे नुकसान झाले. यासोबतच बसमधील २५ प्रवासी जखमी झाले.