23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeलातूर३१८ श्वान, मांजरांचे लसीकरण

३१८ श्वान, मांजरांचे लसीकरण

लातूर : प्रतिनिधी
आज जागतिक रेबीज दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग आणि रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश रेबीज आजाराचे निर्मूलन आणि जनजागृती करण्याचा होता. या मोहिमेत ६५ श्वान आणि २१ मांजरांना जिल्हा पशुसर्वचिकित्सालय, लातूर येथे लसीकरण व उपचार करण्यात आले.

या शिबिराचे उद्घटन पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक कीर्ती तांबे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, सहायक आयुक्त डॉ. मनोज घाटे उपस्थित होते. उत्कर्ष प्रतिष्ठान, लातूर यांच्या मदतीने ९७ भटके श्वान आणि १७ पाळीव श्वानांनाही लस देण्यात आली. तसेच लातूर पेट शॉपी यांच्या वतीने ८८ श्वान आणि ३० मांजरांचे जंत आणि गोचीड निर्मूलन करण्यात आले. या मोहिमेत ३१८ हून अधिक श्वान आणि मांजरांचे लसीकरण तसेच जंत आणि गोचीड निर्मूलन करण्यात आले. उपक्रमामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील प्राण्यांना आवश्यक उपचार मिळाले. डॉ. सोनवणे यांनी म्हणाले की, रेबीज आजाराविषयी जागरूकता वाढविण्याचे महत्त्व सांगून लसीकरण मोहिमेत शाळा, महाविद्यालयं आणि सर्व स्तरांवरील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे सचिव विनोद पांडगे, प्रोजेक्ट चेअरमन विक्रम सोनवणे, हेमंत रामढवे, चंद्रकांत गुंडरे, मेघराज बरबडे यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या आयोजनात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुदर्शन मुंढे, डॉ. धीरज पाटील, डॉ. जितेंद्र वाघमारे, डॉ. शिवा घोटे,डॉ. ओमप्रकाश पोपळे, डॉ. बालाजी देवकते, डॉ. नेताजी शिंगटे, प्रशांत चौधरी, औषधी कंपनीच्या विक्री प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR