22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूर३ लाख रु पयांचा गुटखा जप्त; एकास अटक

३ लाख रु पयांचा गुटखा जप्त; एकास अटक

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या जाफरनगर भागात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा मारून ३ लाख ४९ हजार ४२० रूपयांचा गुटखा जप्त केला. यात जखीयोद्दीन रफीयोद्दीन सय्यद रा. केशवराज शाळेजवळ रियाज कॉलनी लातूर यास अटक करून त्यांच्याकडून वरीलप्रमाणे गुटखा जप्त केला आहे.
एक इसम प्रतिबंधित गुटखा किरायाच्या रूममध्ये साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक १२ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील जाफर नगर भागातील एका घरावर छापा मारून ३ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR