26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीय४०१ वर्षांची टपालसेवा बंद; डेन्मार्क जगातील पहिला देश

४०१ वर्षांची टपालसेवा बंद; डेन्मार्क जगातील पहिला देश

कोपनहेगन : वृत्तसंस्था
डेन्मार्कने ४०१ वर्षांच्या जुनी परंपरा बंद केली आहे. देशाची पोस्टनॉर्ड सेवा, देशांतर्गत पत्र वितरण पूर्णपणे बंद केले आहे. डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनला आहे. त्या ठिकाणी भौतिक पत्रे आता आवश्यक नाहीत. यामुळे ते बंद केले आहे.

गेल्या २५ वर्षांत डेन्मार्कमध्ये पाठवल्या जाणा-या पत्रांच्या संख्येत ९० टक्क्यांनी घट झाली आहे. २००० मध्ये, पोस्टनॉर्डने अंदाजे १.५ अब्ज पत्रे पाठवली. गेल्या वर्षी ही संख्या फक्त ११० दशलक्ष इतकी घसरली.

पोस्टनॉर्डच्या प्रेस प्रमुख इसाबेला बेक जॉर्गेनसेन यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत पत्रांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता बहुतेक संवाद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. त्या म्हणाल्या की, डेन्मार्क हा जगातील सर्वात डिजिटलाइज्ड देशांपैकी एक आहे. येथील लोक सरकारी कामांपासून ते वैयक्तिक संभाषणांपर्यंत सर्व काही ऑनलाइन करतात. म्हणूनच पत्रे कालबा झाली आहेत.

जूनमध्ये, पोस्टनॉर्डने देशभरातून १,५०० लाल पोस्टबॉक्स काढण्यास सुरुवात केली. पहिले १,००० बॉक्स धर्मादाय संस्थेसाठी विकले गेले. प्रत्येक बॉक्सची किंमत अंदाजे ४७२ डॉलर होती. हे बॉक्स फक्त तीन तासांत विकले गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR