४५,४६१ शेतक-यांची होणार कर्जमाफी

लातूर : प्रतिनिधी
सत्तेत येण्यासाठी विद्यमान सरकारने कर्ज माफीची घोषणा करून निवडणूक जिंकली. मात्र कर्ज माफीचे काय असा प्रश्न विधान सभेत उपस्थित झाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जून पर्यंत कर्ज माफी करणार असल्याचे सांगीतले होते. सध्या सुरू असलेली विधान परिषदेची आचार संहिता संतपाच शेतक-यांसाठी कर्ज माफीची घोषणा होईल असे संकेत मिळत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनानेचा लातूर जिल्हयातील ४५ हजार ४६१ थकबाकीदार शेतक-यांना कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. सदर नावांची यादी अपलोड करण्याचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले आहे.
शासनाने पात्र शेतक-यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार लातूर जिल्हयात १ एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२५ च्या  दरम्यान उचल केलेले अल्पमुदत पिक कर्ज जे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंंत ज्या शेतक-यांचे कर्ज थकीत, पण ३१ मार्च २०२६ पर्यंत परत फेड न झालेले कर्ज. एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम २ लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ ४५ हजार ४६१ शेतक-यांना दिला जाणार आहे.
‘त्या’ शेतक-यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ होणार
लातूर जिल्हयातील ज्या शेतक-यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांना १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पिक कर्ज व पिक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली व दि. ३१ मार्च २०२६ पर्यंंत परत न केलेले कर्ज थकबाकी मुद्दल व व्याजासह
एकूण रक्कम ५० हजार रूपयांपर्यंत असल्यास त्यांना या  योजनेतंर्गत ५० हजार रूपया पर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
२ दिवसात उर्वरित थकबाकीदारांची यादी अपलोड होईल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतंर्गत ४५ हजार ४६१ थकबाकीदार शेतकरी असून लेखा परीक्षकांच्याकडून थकबाकीदार शेतक-यांच्या खात्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. सदर शेतक-यांची यादी अपलोड करण्याचे काम जवळपास ७० ते ७५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविष्कार पोतंगले यांनी दिली.
नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सांगीतले होते. त्यानुसार जिल्हयातील नियमित कर्ज फेड करणा-या शेतक-यांचीही प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतक-यांना शासनाकडून ५० हजार रूपये प्रत्येकी मिळणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news