Homeमनोरंजन४५ व्या वर्षी रिद्धिमा कपूरचे सिनेसृष्टीत पदार्पण

४५ व्या वर्षी रिद्धिमा कपूरचे सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई : ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत आहे. दादी की शादी या चित्रपटाद्वारे ती तिचा बॉलिवूड डेब्यू करणार असून कपूर कुटुंबात वयाच्या या टप्प्यावर अभिनयात पदार्पण करणारी ती पहिलीच व्यक्ती आहे.

रिद्धिमासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण यात ती पहिल्यांदा आपली मुलगी समारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ४५ व्या वर्षी पहिल्यांदा कॅमे-यासमोर येणे हा एक वेगळा अनुभव होता. तिने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की हा अनुभव खूप भावनिक आहे.

माझे बाबा (ऋषी कपूर) नेहमी माझ्या पाठीशी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत. या विचारानेच मला हिंमत मिळते. या वयात काहीतरी नवीन सुरू करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. नवीन सुरुवातीची थोडी भीती आणि तेवढीच उत्सुकता मनात आहे असेही तिने मान्य केले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने तिने आपल्या मुलीला पहिल्यांदा घरी एकटे सोडले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR