Homeलातूर४ एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात भरती

४ एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात भरती

लातूर : प्रतिनिधी
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग (एनसीसी) विभागाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून महाविद्यालयाच्या एस. यु. ओ. श्रीखंड घायाळ (अहिल्यानगर पोलीस), कॅडेट  कृष्णा हाके (भंडारा पोलीस), कॅडेट आनंद तोंडारे (पुणे पोलीस) आणि कॅडेट पायल सूर्यवंशी (पालघर पोलीस) अशा ४ कॅडेट्सची महाराष्ट्र पोलीस दलात विविध जिल्ह्यांमध्ये निवड झाली आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमामध्ये नवनियुक्त पोलीस जवानांचा  महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे  आणि सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. नितीन वाणी, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. सुजित हांडीबाग,  डॉ. सदाशिव दंदे, प्रो. डॉ. विजयकुमार सोनी, प्रो. डॉ. दीपक चाटे आणि  प्रो. डॉ. दिनेश मौने यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR