निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त साळुंके यांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा मतदारसघातील निलंगा देवणी व शिरूर आनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी व त्यांच्या चाहत्यांनी गर्दी करीत येथील जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या कार्यालयात त्यांना अभीष्टचिंतन केले तर आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचे पानचिंचोली येथे त्यांच्या मातोश्री सौ. प्रभावती सतीशराव साळुंके यांनी वाढदिवसानिमित्त औक्षण केले. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, देवणीचे तालुकाध्यक्ष अजित बेळकोने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव भंडारे, माजी सभापती अजित माने, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी सरपंच शकील पटेल, उद्योजक अंबादास जाधव, उपसरपंच विठ्ठल पाटील, चेअरमन गंगाधर चव्हाण, अजित निंबाळकर,
कार्याध्यक्ष अँड नारायण सोमवंशी, पकंज शेळके, देवणी उपनगराध्यक्ष अमित मानकरी, अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, लाला पटेल, प्रमोद मरूरे, महेश देशमुख, विकास पाटील, रमेश मदरसे, मदन बिरादार, कुमार पाटील, मुजीब सौदागर, तुराब बागवान,अमोल नवटक्के, बालाजी गोमसाळे, सतिष कोनेरे, अपरिजीत मरगने, पद्मसिंह पाटील,वैजनाथ वलांडे, बालाजी भंडारे, लुल्ले, उमाकांत भंडारे, माधव गाडे, उध्दव पवार, जीवन कांबळे, रवी गायकवाड , किरण रेड्डी, योगेश हिरेमठ, गोविंद मोरे, मुकेश भंडारे, विद्यासागर गांजुरे, गोरख नवाडे ,बालाजी वळसांगवीकर, गोंविद सुर्यवंशी, गिरीष पात्रे, बाळासाहेब पाटील, संजय बिराजदार, दिनकर बिरादार, मालबा घोनसे,अवदुंबर पांचाळ, जगदीश सगर, तुषार सोमवंशी, वैजनाथ वलांडे, रमेश राघो आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांचे चाहते उपस्थित होते.