५४ हजारांहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील नागरी भागातील नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातूनराज्य आणि केंद्र शासन च्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे सेवा संकल्प अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी, ३,५०० हून अधिक रक्त तपासण्या आणि १ हजाराहून अधिक गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच २,७२२ नागरिकांनी योग सत्रांचा लाभ घेतला असून, ५०० हून अधिक नागरिकांना मानसिक आरोग्य समुपदेशन आणि ९५० हून अधिक नागरिकांना टेलिकन्सल्टेशनद्वारे वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत एकूण ३० नागरी आरोग्य संस्था कार्यरत आहेत. यामध्ये  ९ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने, १९ शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रे आणि २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना परिसरातच प्राथमिक आरोग्य सेवा, आवश्यक तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, वजन, उंची आणि इतर आवश्यक तपासण्यांचा समावेश आहे. तसेच ३,५०० हून अधिक रक्त तपासण्यांद्वारे विविध आजारांचे वेळेवर निदान आणि पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येत आहे.माता व बाल आरोग्याच्या दृष्टीने १,००० हून अधिक गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, आवश्यक रक्त तपासण्या आणि पोषणविषयक मार्गदर्शनाचा समावेश आहे. गर्भवती महिलांनी नियमित तपासणी करून घ्यावी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करावे, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी अभियानांतर्गत योग सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत २,७२२ नागरिकांनी योग सत्रांचा लाभ घेतला आहे. नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ५०० हून अधिक नागरिकांना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तणाव व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घेण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जात आहे.तसेच टेलिकन्सल्टेशन (दूरवैद्यकीय सल्ला) सेवेद्वारे ९५० हून अधिक नागरिकांना वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे. या सेवेमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांबाबत वेळेवर सल्ला मिळण्यास आणि आवश्यकतेनुसार पुढील तपासणी व उपचारांसाठी मार्गदर्शन मिळण्यास मदत होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news