अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
तालुक्यात माहे जून ते सप्टेंबर पर्यंत पाऊस खूप कमी प्रमाणात पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर रूप धारण करीत आहे. तालुक्यातील ५७ गावे तहानलेली असून सद्या ४१ गावांमध्ये विहीर, विंधन विहिरी चे अधिग्रहणद्वारे नागरिकांना पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून मात्र नळाद्वारे किती गावांना सुरळीतपणे पाणी पुरवठा चालू आहे हे मात्र माहिती समजू शकले नाही.
या तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करणार आहे.तालुक्यामध्ये सद्या एका ही गावांना टँकर ची मागणी करण्यात आली नाही.मात्र या तालुक्यातील उजना, उमरगा कोर्ट, कुमठा, परचंडा, धानोरा खु.खानापूर,गुंजोटी सह ५७ गावातील ग्रामपंचायत ने येथील पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करुन पाण्याची मागणी करण्यात आली असल्यामुळे यांनी आदी गावचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.यामागणीद्वारे आवश्यक असलेल्या ४१ गावांना आधी ग्रहण करून पाणीपुरवठा चालू केला असून सोहळा गावातील अधिग्रहण बंद करण्यात आले आहे.
















