परभणी : आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जय हिंद गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात ५ हजार श्री कुबरेश्वर धाम येथील पवित्र रुद्राक्षचे वाटप भाविकांना करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री जय हिंद गणेश मंडळाने दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा उपक्रम राबवला. श्री सुरेश महाराज उटी ब्रह्मचारी यांच्या हस्ते व आ. डॉ. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रुद्राक्षाचे भाविकांना वितरण करण्यात आले. सनातन हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुद्राक्ष धारण केल्याने भक्तांच्या जीवनात श्री भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादाने सकारात्मक बदल दिसून येतो अशी मान्यता आहे.
त्यामुळे जय हिंद मित्र मंडळाने हा उपक्रम राबवला. श्री कुबरेश्वर येथील अभिमंत्रित केलेले पवित्र रुद्राक्ष उपलब्ध करण्यात आले होते. यासाठी आ. डॉ. राहुल पाटील, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे यांनी पुढाकार घेतला होता. रुद्राक्ष वाटपासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार एकुण ५ हजार रुद्राक्ष भाविकांना वाटप करण्यात आले.
यशस्वितेसाठी विशु डहाळे, अमित पाचलिंग, श्रीकांत गुंडाळे, सुरज सोळंके, पवन डहाळे, विशाल डहाळे, संदिप पांगरकर, सोमेश डहाळे, जवरेश्वर डहाळे, पवन उदावंत, अरूण चतुर, सागर पातुरकर, प्रशांत टेहरे, कुमार चव्हाण, सचिन शहाणे, सुमित पाचलिंग, नागेश फुलारी, अमोल अंबिलवादे, गणेश टाक, तानाजी शहाणे, कपिल बोकन, स्वरूप डहाळे, बबलु टाक, अमोल शहाणे, शुभम कुरडे, आर्यन उडान आदिंनी परिश्रम घेतले.