26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्र५ हजार ५५५ मिसळींचे मोफत वाटप

५ हजार ५५५ मिसळींचे मोफत वाटप

राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना

कोल्हापूर : प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील हॉटेल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नामवंत हॉटेलमध्ये सेवा बजावणा-या कोल्हापुरी शेफकडून तब्बल ५ हजार मिसळ बनवण्यात आल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरकरांना मोफत मिसळ वाटून कोल्हापुरात खाद्यसंस्कृती रुजवलेल्या राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली.

कोल्हापुरी खाद्य संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या झणझणीत आणि चटकदार जगप्रसिद्ध मिसळीची चव चाखायला मिळाली. कोल्हापूरकरांची सकाळ ही मिसळ खाऊनच होते, खवय्यांच्या जिभेला चटका देणारी चरचरीत मिसळ कोल्हापूरकरांना कायमच प्रिय असते, आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो कोल्हापूरकरांना एकत्र करून ५ हजार ५५५ मिसळ बनवून कोल्हापूरकरांना मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

या अनोख्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा निर्धार एकता हॉटेल कामगार वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे जयवंत पाटील यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR