८० फुटांवर पाळण्यात अडकलेल्या १८ जणांची सुखरूप सुटका

कागल : प्रतिनिधी
येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जॉइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकल्याने या पाळण्यात बसलेले अठरा जण ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले.

रात्री ०८:३० वाजता हे पाळण्यात बसले होते. रात्री ११:३० वाजेपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका- एका व्यक्तीस खाली घेण्यास सुरुवात केली. रात्री १२:३० वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण कागल, कणेरी मठ, गोकुळ शिरगाव येथील होते.

तब्बल चार तास हा थरार चालला. सर्व जण खाली येण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. आपण इतक्या उंचीवर येऊन अडकलो आहोत. या भीतीने चिंताग्रस्त होऊन हे लोक एकमेकांना धीर देत होते, तर खाली नातेवाईक त्यांना हातवारे करून धीर देण्यासाठी धडपडत होते. मोबाइल फोनवरील संपर्क यासाठी मोठा आधार ठरला. यामुळे कोणता गोंधळ उडाला नाही. सर्वांनी संयम बाळगला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीने रात्री ११:०० वाजेच्या सुमारास एका- एका व्यक्तीस खाली उतरविण्यात सुरुवात करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. उरुसानिमित्त दरवर्षी येथे लहान- मोठ्या आकारांतील पाळणे येतात. गेल्या दोन वर्षांपासून हा जॉइंट व्हील नावाचा पाळणा येत आहे. यामध्ये वर्तुळाकारात समोर तोंड करून मांडलेल्या खुर्चीवर लोकांना बसतात. हे वर्तुळाकार चक्र लोखंडी अँगल वरून सरकत वर ऐंशी फुटांवर जाते व तेथे स्थिर होऊन फिरते, अशी याची रचना आहे. सायंकाळी ०७:०० वाजता हा पाळणा सुरू झाला. रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले. पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केला; पण यश आले नाही.

शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचे बचाव पथक बोलवून यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. याप्रसंगी उरूस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीण काळबर, सौरभ पाटील, दीपक मगर, अमित पिष्टे, विवेक लोटे आदींनीही या कामात मदत केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news