17.6 C
Latur
Tuesday, December 16, 2025
Homeमहाराष्ट्र८५ वर्षांच्या वृध्देवर तरुणाकडून अत्याचार

८५ वर्षांच्या वृध्देवर तरुणाकडून अत्याचार

पुणे : प्रतिनिधी
पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराच्या समोर फिरणा-या ८५ वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्या फ्लॅटच्या समोर फिरत असताना आरोपी सोसायटीमध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी आला होता.
आरोपी पाचव्या मजल्यावर आल्यावर त्याने महिला एकटी असल्याचे पाहिले आणि महिलेचे तोंड दाबून तिला जिन्यावरून फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच महिलेला मारहाण केली. या वेळी पीडित महिलाने प्रतिकार करत आरडाओरड केली. नंतर आरोपी तिथून पसार झाला.

महिलेने घरी आल्यावर मुलीला सर्व सांगितल्यावर कुटुंबीयांनी तातडीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरू केले.
पोलिसांनी सोसायटीमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपी चार दिवसांपूर्वी सोसायटीत इलेक्ट्रिकचे काम करण्यासाठी आला असल्याचे आढळले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR