18.7 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeलातूर९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान

९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान

लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ९३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारतून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.
प्रभाग १७ मधील मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे व्यावसायिक शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती, डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान महिलांना देण्यात आले. प्रशिक्षक प्रेमा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ९३ महिलांनी शिलाई कामातील सर्व कला आणि कौशल्ये आत्मसात केली. या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विलास को.. ऑप. बँकेचे चेअरमन अ‍ॅड. किरण जाधव, माजी नगरसेवक राजकुमार जाधव, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, प्रीतम जाधव, उर्मिला मुगळे, अमित जाधव, चंद्रज्योती बिराजदार, विक्रम बिराजदार आणि गजानन बोयणे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR