९७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

विक्रमी मागण्या, विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

शेतकरी कर्जमुक्तीसाठी २० हजार ५५२ कोटींची तरतूद
– मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी ३ हजार ३७२ कोटी
– पुणे रिंग रोड, जालना-नांदेड मार्गासाठी ३०० कोटींची तरतूद
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचा सन २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करून ४ महिने होत नाहीत तोवर राज्य सरकारने सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ९७ हजार ७०६ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. पुरवणी मागण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मेट्रो प्रकल्पासह मुंबईतील विविध प्रकल्पाकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुणे रिंग रोड तसेच जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी ३०० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली.

मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन २०२६-२७ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागणीतील १३ हजार ८२५ कोटी रुपये अनिवार्य खर्चासाठी, ६६ हजार ५५९ कोटींची तरतूद कार्यक्रमांतर्गत खर्चासाठी आणि १७ हजार ३२१ कोटींची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या अंतर्गत अर्थसहाय्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांवर पुढील आठवड्यात म्हणजे २९ आणि ३० जून रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती.

त्यानुसार पुरवणी मागणीत २० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने घेतलेले कर्ज आणि त्या कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी आठ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ३ हजार कोटी तर विकसित भारत-जी राम जी योजनेसाठी ७ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध मेट्रो मार्ग प्रकल्पांसाठी बा वित्तीय संस्थेमार्फत प्राप्त होणारे कर्ज एमएमआरडीएला उपलब्ध करून देण्यासाठी ३ हजार ३७२ कोटी, ठाणे ते बोरिवली दरम्यान वाहतूक दळणवळणासाठी आणि मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्याची दुय्यम कर्जाची रक्कम एमएमआरडीएला देण्यासाठी ४५० कोटींची तरतूद पुरवणी मागणीत झाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान म्हणून १ हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पुणे रिंग रोड आणि जालना-नांदेड महामार्ग प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या कर्जावरील व्याज परतफेडीसाठी भागभांडवली अंशदान म्हणून ५०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुरवणी मागणीतील
महत्वाच्या तरतुदी
– शासकीय कार्यालयांच्या वीजबिलांसाठी ४ हजार कोटी
– अमृत २.० अभियानासाठी ३ हजार ७६ कोटी
विविध घटकांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी २ हजार ३६० कोटी
– अंगणवाडी सेविका आणि कर्मचा-यांच्या मानधनासाठी १ हजार ७३४ कोटी
– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भागभांडवली अंशदानासाठी ७७७ कोटी
– पात्र सहकारी साखर कारखान्यांना सीमांत कर्जासाठी ४८३ कोटी
– नागपूर विधानभवन विस्तारासाठी १०० कोटी रुपये

विभागनिहाय निधी
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग ……..२२ हजार १५ कोटी
नगरविकास ………… १५ हजार १५२ कोटी
उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म …….१४ हजार ७६० कोटी
सार्वजनिक बांधकाम विभाग…………५ हजार ३६१ कोटी

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news