15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeलातूर...अखेर प्रोग्रामरलाही केले कार्यमुक्त 

…अखेर प्रोग्रामरलाही केले कार्यमुक्त 

लातूर : योगीराज पिसाळ
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बोगस घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या प्रकरणी दोन तालुक्यातील दोघांचे निलंबन व तीघांची कार्यमुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मुख्य कार्यालयातील प्रोग्रामरला या प्रकरणी तात्काळ खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार प्रोग्रामरने सादर केलेल्या खुलाशानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रोग्रामरलाही बोगस घरकूलक प्रकरणी दोषी ठरवत सेवेतून कार्यमुक्त केले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलाचा लाभ देताना मंजूर यादीत नाव असणा-या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देणे आवश्यक होते. मात्र सदर घरकूल योजनेत नावे नसलेले ६६ बोगस प्रस्ताव जळकोट व अहमदपूर तालुक्यातून तयार करून त्या खात्यावर ७५ लाख १५ हजार रूपये वर्ग केले होते. सदर बाब समजताच अहमदपूर व जळकोट तालुक्यातील गट विकास अधिका-यांनी वर्ग झालेल्या पैशाची वसूली करून या प्रकरणी दोषी कर्मचा-यांचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील घरकुलाचे शाखा सहाय्यक शिवाजी पांडूरंग अबंदे यांना निलंबीत, तर ग्रामीण ग्रहनिर्माण अभियंता मिलींद शिवाजी ढवळे, डाटा ऑपरेटर सचिन तात्याराव कांबळे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. तसेच जळकोट तालुक्यातील घरकुलाचे शाखा सहाय्यक वैजनाथ सिंधीकुमटे यांना निलंबीत, तर ग्रामीण ग्रहनिर्माण अभियंता राहूल सुरेश कांबळे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते.
तसेच तालुका स्तरावरून आलेल्या बोगस घरकूल लाभार्थी यादीला मंजूरी कशी दिली. ऑनलाईन मंजूरी देताना सदर यादीची खातर जमा न करता कशी मंजूरी दिली या संदर्भाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कंत्राटी प्रोग्रामर अमोल राठोड यास मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी नोटीस बजावून खुलासा तात्काळ सादर करण्यास सांगीतले होते. सदर खुलासा कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर प्रोग्रामर अमोल राठोड यास सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR