19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसोलापूरअनगर अपर तहसील कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी दिली तात्पुरती स्थगिती

अनगर अपर तहसील कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी दिली तात्पुरती स्थगिती

मोहोळ : अनगर येथे मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयाला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला. मागील तीन दिवस आंदोलन सुरू केले होते. यादरम्यान शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अनगर कार्यालयाला स्थगिती देण्याबाबत निवेदन देऊन वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या निवेदनावर लाल शाईने शेरा मारून अपर मुख्य सचिव यांना सदर कार्यालयास तात्पुरती स्थगिती देण्यास सांगितले. तसेच फेरसर्वेक्षण अहवाल सादर करावा असा शेरा दिला आहे. अनगर अपर तहसील कार्यालय रद्द होण्यासाठी मोहोळ तालुका बचाव समितीच्या माध्यमातून शिष्टमंडळाने मुंबई गाठली होती.

या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन सदर निवेदनावरती या कार्यालयाला स्थगितीचा शेरा घेतल्याचे पत्र मोहोळ शहरात येऊन धडकताच शहरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी आमदार भरत गोगावले,अजितदादा गटाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, ठाकरे गटाचे नेते दीपक गायकवाड, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, शिंदे गटाचे राजू खरे, नागेश वनकळसे, भाजपचे नेते संतोष पाटील, माजी जि.प. बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, महेश चिवटे,जिल्हाप्रमुख मुबीना मुलाणी, शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर, अशोक भोसले, मुकुंद आवताडे, सत्यवान देशमुख, विक्रांत देशमुख, गणेश गावडे, ज्ञानेश्वर पाटील, वैभव देशमुख, भाजपाचे रमेश माने, विकास वाघमारे, बाळासाहेब चवरे, लखन पवार आदी उपस्थित होते.

मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय एकीला यश आले आहे. तालुक्यावर आलेले संकट दूर झाले आहे. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने दाखविलेल्या एकजुटीचे हे यश आहे.असे अजित पवार गटाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR