जळकोट : प्रतिनिधी
एखादा अधिकारी तसेच कर्मचारी आपल्या कामाची चुणूक संबंधित ठिकाणी दाखवत असतात, तसेच अनेक अधिकारी अशी असतात की, आपल्या बरोबर काम करणा-या कर्मचा-यांना प्रेमळ वागणूक, तसेच त्यांच्याकडून काम करून घेण्याची पद्धत ही अतिशय वेगळी असते. यामुळे असे अधिकारी हे कर्मचा-यांना हवेहवेसे वाटतात असेच जळकोट येथील उपविभागीय अभियंता कार्यालयातील सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले दिलीप भोसले यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे झाली. बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात दिलीप भोसले यांना निरोप देताना जळकोट उपविभागीय अभियंता कार्यालयातील अनेक कर्मचारी ढसाढसा रडले, अनेक कर्मचा-यांना त्यांचे अश्रू अनावर झाले, एकंदरीत या कार्यक्रमांमध्ये उपअभियंता भोसले आणि कार्यरत कर्मचा-यां मध्ये काम करत असताना सलोखा कसा होता हेच दिसून आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता महेश वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता मयूर पाचपुते, अमर पठाडे, रामराव बिरादार, एम. डी. मुंडे , विवेकानंद कुंभार, गोपाळ महाराज, पत्रकार ओमकार सोनटक्के, राजकुमार धुळशेट्टे, एम. जी. मोमिन यांची उपस्थिती होती.
उपअभियंता भोसले हे चार वर्षापासून जळकोट येथे कार्यरत होते. त्यांच्या जागी मयूर पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली असून याप्रसंगी महावितरण कर्मचा-यांच्यावतीने जळकोट उपविभागीय कार्यालय तसेच नळगीर येथील शाखा अभियंता कार्यालय, हाडोळती येथील शाखा अभियंता कार्यालय येथील लाईनमन तसेच कर्मचा-यांच्या वतीने दिलीप भोसले यांचा सपत्नीक भर आहेर देऊन सत्कार करण्यात आला . यासोबतच कर्मचारी संतोष गायकवाड, यादव केंद्रे, निरंजन स्वामी यांचीही बदली झाली यामुळे कर्मचा-यांच्या वतीने यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपविभागीय अभियंता महेश वाघमारे, पत्रकार ओमकार सोनटक्के, राजकुमार धुळशेटे, दिलीप भोसले, मोमीन, फिरोज तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी रविशंकर वंजे यांनी केले. या कार्यक्रमास वरीष्ठ तंत्रज्ञ सचिन टाले, संतोष गायकवाड, यादव नागरगोजे, हसन पठाण, बंटिलाल चौधरी, सौ. नर्गीस बागवान, प्रविण वाघमारे, फिरोज तांबोळी, रविशंकर वंजे, श्रीकांत राजगे, फतरुसाब बागवान, वरीष्ठ यंत्रचालक पी. एस. मोरे, शरीफ शेख, अजर शेख, निरंजन स्वामी तसेच उपविभागातील साहाय्यक लेखापाल निहारकर साहेब, ओंकार राघव, सौ. जाधव, नरुटे, चुकेवाड या कर्मचा-यासह जळकोट शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.