मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी (दि. ११) रात्रीच्या सुमारास मुंबईतील घरी अचानक बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोविंदाचे वकील आणि मित्र ललित बिंदल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गोविंदाला सतत अस्वस्थता जाणवत होती. सध्या त्याच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. आता अहवाल आणि न्यूरो कन्सल्टेशनच्या मताची वाट पाहत आहोत. तो आता स्थिर आहे.
गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याच्या घटनेनंतर एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अपघात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरला हाताळत असताना घडला होता.

