मुंबई : वृत्तसंस्था
हिंदी चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम आणि टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ७ हजार रुपये किमतीचा टीव्ही चोरला आहे. या घटनेबाबत मोहम्मद अझहरूद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मालकीचे ते फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करत आहेत.
रिपोर्टनुसार, संगीता बिजलानीने पुणे रुरल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एसपी संदीप गिल यांनी सांगितले की, संगीता बिजलानी मागील चार महिन्यांपासून आपल्या फार्म हाऊसवर गेली नव्हती. आपल्या तक्रारीत संगीताने सांगितले की, ती ४ महिन्यांनंतर १८ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता आपल्या फार्म हाऊसवर पोहोचली होती.
संगीता दोन स्टाफ मेंबर्ससोबत तिथे गेली होती. तिथे संगीताने पाहिले की, फार्म हाऊसची मेन एन्ट्रन्स तोडण्यात आले होते.