19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरआठ मालमत्ताधारकांनी केला थकीत कराचा भरणा

आठ मालमत्ताधारकांनी केला थकीत कराचा भरणा

लातूर : प्रतिनिधी
मालमत्ता कर हाच लातूर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्या दृष्टीने सालसन २०२३-२४ वर्षात मनपातर्फे वसुली मोहिम राबविण्यात आली, ज्याअंतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या व वेळोवेळी कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले. त्यास बहुतांश मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देऊन आपल्या कराचा भरणा करुन मनपास सहकार्य केले. थकीत मालमत्ताधारकांवर मनपाने धडक कार्यवाही करताच आठ मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा केला.
परंतु, काही मालमत्ताधारकाकडे कर थकीत आहे. थकबाकिदार यांना थकीत रकमेवर दरमहा व्याज सुद्धा लागत आहे. थकीत मालमत्­ताकराचा भरणा करण्­याबाबत वेळोवेळी मागणी बीले,नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्­याने क्षेत्रीय कार्यालय ए, बी, सी, डी, अंतर्गत येणा-या कार्यक्षेत्रामध्ये थकित मालमत्ताधाकराच्या वसुलीसाठी दि. १७ मे रोजी एकूण १६ वाणिज्य आस्थापनावर कार्यवाही करण्यात आली.  सदर मालमत्­तापैकी पेट्रोल पंप कार्यालय, बॅक व्­यवस्­थापक कार्यालय, लाकडी गोडाऊन तसेच इतर वाणिज्­य आस्­थापनावर कार्यवाही करताच यामधील आठ मालमत्ताधारकांनी आपल्­याकडील थकीत कराचा भरणा केला आहे.
या पुढेही थकीत कराच्­या वसूलीसाठी थकबाकी मालमत्­ताधारकांवर जप्­तीची कार्यवाही करण्­यात येणार असून थकबाकीधारक मालमत्­ताधारकांनी आपल्­याकडील थकीत मालमत्­ताकर व पाणी पट्टी कराचा भरणा करून जप्तीसारखी होणारी कठोर कार्यवाही टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR