आयएमएच्या शहर स्वच्छता उपक्रमास चंद्रनगरातून सुरुवात

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर हरीत स्वच्छ व  पयार्वरणाणुकुल करण्याचा संकल्प आयएमएच्या लातूर शाखेने केला असून या विधायक उपक्रमास त्यांनी  सुरुवातही केली आहे. शहर  स्वच्छतेचे वर्षभराचे नियोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात मंगळवार दि. ९ जून रोजी येथील चंद्रनगर येथून परिसर स्वच्छतेने करण्यात आली.  या सेवाकार्यात  डॉक्टर्स, मनपा कर्मचारी तसेच त्या परिसरातील नागरीक सहभागी झाले होते.
चंद्रनगर येथील वर्धमान उद्यानात स्वच्छता करण्यात आली. पालापाचोळा, प्लास्टिक संकलीत करण्यात आले. उद्यानातील झाडांना आळे करण्यात आले. २ ट्रॅक्टर कचरा संकलीत करण्यात आला. यात कॅरीबँग्जही  असल्याने डॉक्टरांनी तेथील नागरीकांना प्लास्टिकचा कॅरीबॅग्जचा वापर करु नका कापडी पिशव्या वापरा असे आवाहन केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या परिसरातील रसत्यांची स्वच्छता केली. दरम्यान आयएमएचे हे स्वच्छता अभियान वर्षभर सुरू राहणार आहे.
दर महीन्याच्या ९, १९ व २९ तारखेला ही स्वच्छता होणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. स्वच्छता श्रमदानाच्या तारखेची पूर्वकल्पना त्या भागातील नागरीकांना देण्यात येणार असून त्यांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. शहर स्वच्छतेत लोकसहभाग वाढावा  व हे अभियान लोकचळवळ व्हावी, असा आएमएमएचा मानस असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार असल्याचे लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत व सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी सांगितले.
लातूर महापालिका आयुक्त मानसी मीना, उपायुक्त वसुधा फड व त्याच्या टिमचे याकामी सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले.  चंद्रनगर   येथील स्वच्छता कामात डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. विश्रांत भारती, डॉ. श्वेता पवार, डॉ.  वर्षा दराडे, डॉ. आकांक्षा अवस्थी, डॉ.  शुभांगी राऊत, डॉ. वेदांत अवस्थी, डॉ. गणेश पवार, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. शैला सोमाणी, डॉ. आंनद कलमे, जयप्रकाश
चितकोटे, सुनीता चितकोटे, अजय  शहा, संजय बोरा, सुमन कलंत्री,  आशिष कलंत्री, सुभाष दुर्गवाड यांच्यासह त्या परिसरातील  नागरीक व महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news