सोलापूर : बोगस डॉक्टरावर गुन्हा
नोंदवल्याचे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी कुमठा नाका परिसरातील एका क्लिनिकची तपासणी केली. संबंधित डॉक्टर विनापरवाना दवाखाना चालवत असल्याचे समोर आले. संबंधिताविरुद्ध पोलिसांत तक्रार देणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.
शहरात रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर व दवाखान्यांवर कारवाईची धडक मोहीम आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी हाती घेतली आहे. यापूर्वी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा नोंदलेला आहे.
आरोग्याधिकाऱ्यांनी राबवलेल्या तपासणी मोहिमेत कुमठा नाका येथील बकुल क्लिनिकची तपासणी केली.
यात संबंधित डॉक्टर विनापरवाना दवाखाना चालवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी डॉक्टर रुग्णाला तपासत होता. सात रुग्णांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार देत असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.