हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोलीतून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. वसमत तालुक्यातील टोकाई ते कोठारी रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टोकाई पाटीजवळ रस्त्यावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या डम्परला भरधाव वेगाने येणा-या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

