हिंगोली : ओबीसी आरक्षणासाठी हिंगोलीत तरुणाने आयुष्य संपवले आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहितीनुसार, तरुणान बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. तो नोकरीच्या शोधात होता. तरुण ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान, तरुणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी कुटुंबियांसह गावक-यांनी त्याचा मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष शिवाजी कागणे (वय वर्षे २७) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. तरुण हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा गावातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तो नोकरीच्या शोधात होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तसेच संतोष शिवाजी कागणे ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातही सहभाग घ्यायचा, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
दरम्यान, त्याने ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवले आहे. गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. संतोष या तरुणाला न्याय देण्यासाठी कुटुंबासह गावातील नागरिक एकवटले आहेत. कुटुंबियांनी संतोषच्या मृतदेहाला अग्नी दिला नाही. त्यांनी मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवला आहे.

