31.2 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeलातूरकाँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे काँग्रेसच्या झोन अध्यक्षांचा सत्कार

काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे काँग्रेसच्या झोन अध्यक्षांचा सत्कार

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विक्रमनगर येथे आयोजित कार्यक्रमात लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या नुतन झोन अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या कार्यकमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, विलास को-ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. समद पटेल यांची उपस्थिती होती.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे ‘अ’ झोन अध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख, ‘ब’ झोन अध्यक्ष कैलास कांबळे आणि ‘क’ झोन अध्यक्ष सूर्यकांत कातळे यांचा सत्कार अ‍ॅड. समद पटेल, अ‍ॅड. दीपक सुळ यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी माजी नगरसेवक धोंडीराम यादव, माजी नगरसेवक आकाश भगत, प्रभागाचे अध्यक्ष डॉ. बालाजी सोळुंके, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पवन सोलंकर, विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष विजय टाकेकर, प्रा. शिवशरण हावळे, रमेश गंडले, विनय सुरवसे यांची उपस्थिती होती.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शामराव सूर्यवंशी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास राजू गवळी, नितीन कांबळे, किरण बनसोडे, नानासाहेब डोंगरे, पवनकुमार गायकवाड,  असलम शेख, फारुक शेख, बब्रूवाण गायकवाड, अशोक सूर्यवंशी, काशिनाथ वाघमारे, दयानंद कांबळे, सोमीन वाघमारे, आशुतोष मुळे, आकाश मगर, राजु सुरवसे, राजाभाऊ गायकवाड, संदिपान सूर्यवंशी, साजिद शेख, हरीश वाघमारे, विशाल त्रिभुवन, प्रमोद उबाळे, रोहित सागर, भैय्या शिंदे, अमल कांबळे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR