लातूर : सिद्धेश्वर दाताळ
भाजी करायची म्हटलं तर तिखट लागतंच मात्र, लहरी हवामानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची आवक घटली आहे. घरगुती जेवणात तिखटपणा जाणवण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा भाजी केली जाते. त्या तुलनेत बाजार समितीत आवक नसल्याने मिरचीचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात हिरवी मिरची १०० ते १२० रुपये प्रती किलो दराने विक्री सुरू आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारात दररोज ६२० क्ंिवटलची आवक होत आहे. मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातून होणा-या मिरचीची आवक कमी झाल्याने सध्या किरकोळ बाजारात मिरचीचा ठसका उठला आहे त्यामुळे गृहिणींचे बजेट कोमडले आहे.
किरकोळ बाजारात सध्या हिरव्या मिरचीचे भाव हे कमालीचे वाढले आहेत. मिरची महाग झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोने मिरची विकली जात आहे. घाऊक बाजारात मिरचीची आवक ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. बाजार समितीत येणारी मिरची ही ग्रामीण भागातून तसेच शेजारी जिल्ह्यातून येते. सध्या जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत बाजार समितीत आवक काहीशी सुधारली आहे. किरकोळ बाजारातील महागाईचा भाव हा मागच्या आठवड्याच्या तुलनेत पुढे आहे. याची झळ आता सर्वसामान्यांच्या खिशावर थेट पोहोचू लागली आहे.
सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे भाव हे कमालीचे वाढले आहेत. मिरची महाग झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडून गेले आहे. नेहमीच्या जेवणात फोडणीसाठी आणि चवीला तिखटपणा आणण्यासाठी हमखास वापरली जाणारी मिरची आता लोकांच्या खिशाला झोंबू लागली आहे. किरकोळ बाजारात मूठभर मिरचीसाठी २० ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचा भाव ४० ते ५० रुपये इतका होता मात्र आता हाच भाव तब्बल १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे हिरवी मिरची महाग झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले आहे.