15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeलातूरग्रामपंचायत कर्मचा-याचा शॉक लागून मृत्यू

ग्रामपंचायत कर्मचा-याचा शॉक लागून मृत्यू

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे वय ३५ हे गावातील पोलावर चढून बल्ब बसवत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसून तो पोलावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिं. ११ नोंव्हेबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.

क्षणभरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण चापोली गावात शोककळा पसरली आहे. चापोली ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून दोन वर्षांपासून कामावर रुजू झाले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता गावातील एका पोलवर बल्ब बसविण्यास ते चढले असता अचानक विद्युत पोलवरून खाली कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याचा विवाह येत्या दि १२ डिसेंबर रोजी होणार होता. त्यापूर्वीच त्याच्यावर मृत्यूने घाला घातला. ही घटना चापोली गावात वा-यासारखी पसरताच घटनास्थळी जमा झालेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR