सोलापूर : भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी, सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा, स्वातंत्र्याची गळचेपी करणारी जनसुरक्षा कायदा रद्द करा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा कायदा रद्द करा, फडणवीस सरकार होश मे आओ, महायुती सरकार तेरी तानाशाही नहीं चलेगी अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी या कायद्यामुळे सामान्य जनतेपासून विरोधकांपर्यंत सर्वांच्या हक्कांना बाधा येणार असून, तो लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे हा जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारकडे मागणी केली आहे.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, मोहोळ शहर अध्यक्ष किशोर पवार, महिला शहर अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बळोरगी, राजेश अप्पा पवार, भारत जाधव, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापूरे, महेश जोकारे, तिरुपती परकीपंडला, सुवर्णा मलगोंडा, सिद्धाराम चाकोते, बसवराज म्हेत्रे, एन.के. क्षीरसागर, सातलिंग शटगार, भोजराज पवार, पशुपती माशाळ, राहुल वर्धा, अनिल मस्के, एजाज बागवान, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, नागेश म्याकल, नूर अहमद नालवार, वैभव पाटील, संजय गायकवाड, सागर उबाळे, भीमराव शिंदे, हसीब नदाफ, गणेश रेड्डी, शोहेब महागामी, नागेश म्हेत्रे, सुभाष वाघमारे, पृथ्वीराज नरोटे, शिवाजी साळुंखे, सचिन गुंड, अनिल वाघमारे, श्रीशैल रणधिरे,
गिरिधर थोरात, शशिकांत जाधव, वशिष्ठ सोनकांबळे, शिवशंकर अंजनाळकर, चैतन्य घोडके, अनिल जाधव, अर्जुन पाटील, अशोक देवकते, अरुण जाधव, नितीन ननवरे, मुबारक शेख, प्रशांत शेळगी, अँड निशा मरोड, करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, सुशीलकुमार म्हेत्रे, योगेश रणधिरे, चंदा काळे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, सलीमा शेख, मीरा घटकांबळे, संदीप पवार, बिरा पुजारी, ज्योती गायकवाड, इरफान शेख, नागनाथ शावणे, आदित्य म्हमाणे, व्यंकटेश बोमेन, सतीश सुरवसे, आकाश वाघमारे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, द्रौपदी शिवशरण, साई शिंदे, रफिक रामपूरे, आबा मेटकरी, सरफराज नदाफ, रुकैयाबानू बिराजदार, दत्तात्रय गजभार, श्रीकांत दासरी, मधुकर गाजुल, नागेश कांबळे, बसवराज बानेगाव, दत्ता पाटील, मुबारक शेख, भीमाशंकर पाटील, आमसिद्ध बिराजदार, बनसिद्ध बिराजदार, आनंद पाटील, श्रीशैल बिराजदार, सचिन पवार, मलकारसिद्ध बिराजदार, नागनाथ बिराजदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.