सोलापूर : तपासणीत पॉस मशीनने खताचा
शिल्लक साठा किती सांगितले?, मात्र प्रत्यक्षात साठ्यात तफावत आढळून आल्याने खत दुकानदाराची लपवा-लपवी उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एक ते चार आठवड्यांच्या कालावधीसाठी ही दुकाने निलंबित केली आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खत दुकानांच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मागील महिन्यात विविध कारणांमुळे जिल्ह्यातील १४ दुकानांचे परवाने तात्पुरते निलंबित, तर एका दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
सिद्धेश्वर कृषी भांडार अक्कलकोट, जकराया कृषी केंद्र माचणूर, गवसाने कृषी केंद्र वैराग कोलेकर अॅग्रो सर्व्हिसेस कडलास या खत विक्रेत्यांचा परवाना सात दिवसांसाठी, यशवंत कृषी केंद्र आचेगाव, विठ्ठल कृषी केंद्र शेगान दुमाला, कृषी संजीवनी अॅग्रो एजन्सी अनवल धनश्री अॅग्रो एजन्सी अनवली, आदिती फार्मी प्रोड्युसर कंपनी अनवली पंढरपूर, गायकवाड अॅग्रो सर्व्हिसेस चले, फार्मर डिलाईट अॅग्र प्रोड्युसर कंपनी चळे,
सार्थक कृषी केंद्र तावश सद्गुरू कृषी केंद्र केसकरवाडी, शेतकरी कृष् केंद्र केसकरवाडी, स्वरा कृषी केंद्र लोणारवार्ड धुळदेव कृषी सेवा केंद्र शिरढोण, बळीराज हायटेक अॅग्रो सर्व्हिसेस उंबरेपागे, शंभू कृष् भांडार उंबरेपागे, आदर्श कृषी केंद्र जळोली कोळेकर अॅग्रो सर्व्हिसेस कडलास या खन विक्रेत्यांचा परवाना पंधरा दिवसांसाठी, त रुक्मिणी कृषी केंद्र देगांव पंढरपूर, विठुमाऊल कृषी सेवा केंद्र सिद्धेवाडी, सिद्धनाथ कृषी सेव केंद्र चळे, शेतकरी कृषी केंद्र सोनके, रुक्मिण कृषी सेवा समूह खर्डी, शेतकरी कृषी केंद्र कौठाळी यांचा विक्री परवाना तीन दिवसांसाठी, तर बागवान कृषी केंद्र वाखरी याचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सुनावणी घेऊन ही कारवाई केली आहे.