15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeराष्ट्रीयदेशात अल कायदाचे स्लीपर सेल?

देशात अल कायदाचे स्लीपर सेल?

एनआयएचे ५ राज्यांत १० ठिकाणी धाडसत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एनआयएने आज देशातील ५ राज्यांत मोठी कारवाई करीत १० वेगवेगळ््या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. बांगलादेशी अवैध स्थलांतरितांशी जोडल्या गेल्या अल कायदा गुजरात टेरर प्लॉंट प्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची एनआयएच्या पथकांनी कसून तपासणी केली.

जून २०२३ मध्ये एनआयएने अल कायदा गुजरात केस अंतर्गत अनलॉफूल अ‍ॅक्टिव्हीटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट कायद्यासह आयपीसी आणि विदेशी अधिनियमच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या तपासातून मोहम्मद सोजिजमियां, मुन्ना खालीद अन्सारी ऊर्फ मुन्ना खान, जरुल इस्लाम ऊर्फ जहांगीर उर्फ आकाश खान आणि अब्दुल लतीफ ऊर्फ मोमिनुल अन्सारी या चार बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली. हे सर्वजण अवैधरित्या भारतात घुसले. यासाठी त्यांनी बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर केला. विशेष म्हणजे या चौघांचे संबंध थेट बंदी घातलेल्या अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत.

१ नोव्हेंबर २०२३ रोजी एनआयएने अहमदाबाद विशेष न्यायालयात या पाचही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपी बांगलादेशमधील अल कायदाच्या कार्यकर्त्यांसाठी निधी गोळा करणे, तो हस्तांतरित करणे यामध्ये सक्रीयपणे सहभागी होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR