24.4 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeमहाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील जेवळी, कास्ती बुद्रुक येथे २० हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 

 धाराशिव जिल्ह्यातील जेवळी, कास्ती बुद्रुक येथे २० हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 

मुंबई :  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे वन महोत्सव अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील जेवळी व कास्ती बुद्रुक (ता. लोहारा) येथे २० हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवार, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 जेवळी (ता. लोहारा) येथे आयोजित या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार प्रवीण स्वामी, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार (भा. प्र. से.), ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, जेवळीच्या सरपंच श्रीमती महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जुलै महिन्यात साजरा होणा-या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने म्हाडातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. सामाजिक बांधीलकीच्या तत्त्वावर गृहनिर्मिती करणा-या ‘म्हाडा’ने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने राज्यभरात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे.
        म्हाडातर्फे पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात सुमारे ५०,००० झाडे लावण्याचे काम सुरू आहे. मुंबई मंडळातर्फे ५०,००० व कोकण मंडळातर्फे २५,००० झाडे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आवारात लावली जात आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे निमोण (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जैवविविधता उद्यानात १५,००० झाडे लावण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुंभारली येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्प परिसरात पुणे मंडळातर्फे ९,५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
        सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तू नवले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR