छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणूक स्थगित झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका केली. आयोगाच्या या निर्णयामुळे पुढील काळात निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हीच आयडिया वापरली जाईल, असा धोका शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
अंबादास दानवे म्हणाले की, निवडणूक आयोग चुकीचा पायंडा पाडत आहे. पुढील काळात निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अशा पद्धतीने आक्षेप घेतले जाऊ शकतात. ही आयडिया पुढील काळात रबविली जाऊ शकते, असा धोक्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
माजी विरोधी पक्षनेते म्हणाले की, खरे तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको होती. त्यांचेच अधिकारी निर्णय घेणारे आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांना कोर्टात आव्हान दिले गेले. त्यासंबंधीचा निकाल कोर्टातून वेळेत लागला नाही, तेव्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतलेला निर्णय कायम समजला गेला पाहिजे होता, पण निवडणूक आयोगाने चुकीचा अर्थ लावून जवळपास ३० नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली आहे.
दानवे म्हणाले की, निवडणूक पुढे ढकलली गेल्यामुळे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांचे परिश्रम आणि श्रम वाया जाणार आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत चुकीची भूमिका घेतली आहे.
भाजपचे निवडणूक आयोगाची संगनमत : संजय राऊत
पुढच्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा, यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगनमत केलेली राजकीय व्यवस्था आहे, अशा एका वाक्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.

