17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रपरीक्षेत नापास झाले पण हरले नाही

परीक्षेत नापास झाले पण हरले नाही

अमरावती : प्रतिनिधी
मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाले. मी कुठे तरी कमी पडले असेल, मात्र मी कधीही हार मानली नाही. माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला. मात्र चमकणारा तारा नेहमी चमकतच राहतो. आता आगामी काळात मी तयारी करून परत राजकारणाच्या नव्या मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे. अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. अमरावती येथील कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय. विद्यार्थीजीवनात असे मंच फार महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात. आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळाले तर आपण अधिक जोमाने काम करत असतो.

असे असले तरी आधी नवनीतला हरवले आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात. पण जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार, पण ज्यांनी नाही केले त्यांना एकच सांगते की, १० वर्षे अमरावती मागे गेली आहे. त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली. आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहिजे, असे आवाहनही नवनीत राणा यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR