17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरपोलिसांची बनावट गुटखा कारखान्यावर धाड

पोलिसांची बनावट गुटखा कारखान्यावर धाड

लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील कोंबडे अ‍ॅग्रो एजन्सी या वेअर हाऊस मध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट गुटखा बनविणा-या कारखान्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उप विभागीय पोलीस आधिकारी, चाकूर यांच्या पथकाने बुधवारी दुपारी धाड टाकली. या धाडीमध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर,  सिलिंग करणा-या मशीन, गोवा १००० असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिक अप असा एकूण तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सात जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उप विभागीय पोलीस आधिकारी, चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैद्यरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक २८ मे रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील कोंबडे अ‍ॅग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर धाड टाकली. धाडीमध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर,  सिलिंग करणा-या मशीन, गोवा १००० असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिक अप असा एकूण ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी आरोपी नामे अंकुश रामकिशन कदम, वय ३२ वर्षे रा. रामवाडी ता. चाकूर, हसनकुमार तिलाही उराम व २१ वर्षे रा. शाहबगंज राज्य बिहार, गोकुळ धनराम मेघवाल रा. चुवा, राज्य राजस्थान, धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर, पारस बालचंद पोखरणा, रा लातूर, राम केंद्रे, रा. लातूर व विजय केंद्रे, रा लातूर यांचे विरुद्ध एमआएडीसी पोलिस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोना अनंतवाड, पो. काँ. कांबळे,  धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजाविली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR