लातूर : वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड, प्रा.वृषाली मगदूम, डॉ. देवकुमार अहिरे यांची निवड करण्यात आली व जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संशोधक, विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक किशोर बेडकिहाळ व अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्यावतीने सहा वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षीच्या सहाव्या पुरस्कारासाठी विचारशलाका त्रैमासिक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप डॉ. भा. ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे. माधुरी सुमंत, विजयाताई भोळे व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे.

