लातूर : प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात येणा-या प्रारुप मतदार यादीसाठी राज्य निवडणुक आयोगाने दृस-यांदा मुदतवाढ दिली आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. परंतू, मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या नवीन कार्यक्रमानूसार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक एक प्रक्रिया पूर्ण कण्यात येत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या १८ प्रभागांसाठी ७० सदस्यांसाठी ही निवडणुक होणार आहे. सुरुवातीला महानगरपालिकेच्या १८ प्रभागांची रचना झाली. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. आरक्षणानंतर अनेक इच्छूकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, तर काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा धक्काही बसला. त्यानंतर सर्वांचेच लक्ष प्रारुप मतदार यादीकडे लागले होते. परंतू, प्रारुप मतदार यादीला तिस-यांदा मुदतवाढ मिळाल्याने आता प्रारुप मतदार यादी दि. १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाने सुरुवातीला ६ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करावी, असा कार्यक्रम जाहीर केला होता. पण काही तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करुन नव्याने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानूसार दि. १४ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. यादी तयार करुन लातूर शहर महानगरपालिकेने राज्य निवडणुक आयोगाकडे पाठवली होती. गुुरुवारी सायंकाळपर्यंत ही यादी मान्यता होऊन महानगरपालिकडे आली नव्हती. त्यामुळे विविध चर्चेला उधाण आले होते. याला पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडेही लक्ष लागले होते. अखेर झाले तसेच. राज्य निवडणुक आयोगाने याला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानूसार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम दिली आहे.

