21.4 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसच उपमुख्यमंत्री

फडणवीसच उपमुख्यमंत्री

राजीनाम्याबाबत चर्चा नाही, राज्य भाजपातही बदल नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला. ही जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज होता. पण फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरच करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मते मिळाली, कुठे चांगले यश मिळाले, कुठे कमी मते मिळाली? त्याची कारणे काय काय होती? निवडणुकीत कोणकोणत्या मुद्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ््या गोष्टींची चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्यासोबत येत्या विधानसभेच्या रोडमॅपवरदेखील प्राथमिक चर्चा आम्ही केली.

विधानसभेत महायुतीच्या
घटकपक्षांसह लढणार
कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल, या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला. याबाबत आता लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत पुढे कसे जाता येईल, याबाबतची कार्यवाही येत्या काळात आम्ही करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR