लातूर : प्रतिनिधी
शहरातील बाजारपेठेत आरोग्य वर्धक जांभळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. फळांमध्ये जांभुळ हे एक लाकप्रिय फळ माणले जाते. सध्या शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सध्या ग्रामीण भागातून बाजारपेठेत दाखल झालेल्या गावराण जांभूळांची मागणी वाढली आहे.
लातूर शहरातील बाजार पेठेत वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळया फळांची ग्राहक वर्गातून मागणी होत असते. यंदा जांभूळ उशिराने बाजारपेठेत दाखल झाले आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तूलनेत जांभळाला चागलाच भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील किरकोळ बाजारात जांभळाला प्रतिकिलो २०० रूपयांचा भाव मिळत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. शहरातील चौकाचौकातील दुकानातून मोठ्या प्रमाणात जांभळांची विक्री सुरू आहे. त्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरूवातीला जांभळे बाजारपेठेत दाखल होत असतात. गेल्या काही दिवसापासून शहरातील रस्त्याच्या कडेलाही बसून जांभळांची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. माणवी शरिरासाठी पौष्टिक असलेल्या जांभूळ फळाला मागणी आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे जाभळांचा बहर कमी आल्यामुळे आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सागीतले आहे. आयुर्वेदामध्ये जांभळाला महत्त्वाचे स्थान आहे. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. तसेच पावसाळी वातावरणात ते खाणे उत्तम मानले जाते. त्यामुळे सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात जांभळाला मागणी वाढली आहे.