17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयमतदान सक्तीचे होणार; सरकार कायदा करणार!

मतदान सक्तीचे होणार; सरकार कायदा करणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात उशीरापर्यंत ग्रामीण भागात मतदान सुरू असल्याचे दिसून आले. ज्या भागात तांत्रिक अडचणी आल्या अथवा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली तिथे हे चित्र दिसून आले. मेट्रो आणि मोठ्या शहरात मात्र मतदारांनी पुन्हा घोर निराशा केली. आदिवासी बहुल जिल्ह्यातील मतदानाने लोकशाहीचा उत्सव उत्साहाने साजरा झाल्याचे दिसले. तर सुट्टी मिळून सुद्धा शहरी मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

या पार्श्वभूमीवर आता देशात मतदान सक्तीचे करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यात केंद्रातील या बड्या नेत्याने सुद्धा लोकसभेत यासाठी आवाज उठवण्याचे जाहीर केले. सक्तीच्या मतदानासाठी त्यांनी कायदा करण्याची आवश्यकता वर्तवली आहे.

राज्यात शहरी आणि काही निम शहरात कमी मतदानाने निवडणूक आयोगाच्या उपायांवर पाणी फेरले गेले. यावेळी निवडणूक आयोगाने शहरांमधील काही सोसायट्यांमध्ये सुद्धा निवडणुकीची व्यवस्था केली होती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सेल्फी पॉईंटपासून ते विविध रंगाचे बुथ, मतदान करण्याचे आवाहन केले होते. पण तरीही शहरी भागात मतदानाचा टक्का कमी असल्याचे दिसून आले. उलट ग्रामीण आणि दुर्गम भागात मतदानाचा टक्का अधिक असल्याचे दिसून आले.

मतदानाचा टक्का वाढीसाठी रामदास आठवले यांनी सक्तीचा मतदान कायदा करण्याची वकिली केली. मतदान ९० टक्क्यांहून अधिक व्हावे यासाठी पावलं टाकणं गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला काही उपाय पण सुचवले. मतदानाचा टक्का वाढीसाठी एका बुथवर ५०० मतदारांची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी ते निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR