महसुली नाल्यांवरील अतिक्रमण हटणार: चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी महसुली नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपुरात ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील महसुली नाले, पाणंद रस्ते आणि शेतक-यांच्या वाहतुकीचे मार्ग पूर्ववत करणे हे महसूल विभागाचे मूलभूत कर्तव्य आहे. महसुली नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होईल, पूरस्थिती टळेल आणि शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

सबसिडीतील सवलतींबाबतदेखील त्यांनी भाष्य केले. काही वेळा सवलती कमी झाल्याचे दिसून येते; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्या पूर्ववत होतात. कोरोनाच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतर ती सामान्य झाली होती. आताही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे ते म्हणाले. महायुतीतील अर्थखात्याच्या वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. कोणत्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोव्याला जाणा-या नगरसेवकांना पक्षाकडून मदत नाही
नागपूरचे सर्व नगरसेवक मुंबईला प्रशिक्षणाला जात आहेत व तेथून ते पर्यटनाला जाणार आहेत. यासाठी पक्षाकडून कुठलीही मदत करण्यात आलेली नाही. सर्व नगरसेवकांनी स्वत:च्या जवळील पैसे खर्च केले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींइतका कार्यकाळ कुणीच पूर्ण करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते इतका वेळ कार्य करतील की त्यांच्या इतका पंतप्रधानपदाचा कार्यकाळ कुणीही पूर्ण करू शकणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news